केडगाव प्रेस क्लबच्या
अध्यक्षपदी योगेश गुंड,
नविन कार्यकारिणीची निवड : उपाध्यक्षपदी अनिल हिवाळेतर सचिवपदी मुरलीधर तांबडे
केडगाव – केडगाव प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी पत्रकार योगेश गुंड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी अनिल हिवाळे, सचिवपदी मुरलीधर तांबडे,सहसचिव शुभम पाचारणे, खजिनदारपदी अमित मन्यार, सहखजिनदारपदी ओंकार देशपांडे तर कार्याध्यक्षपदी अशोक तांबे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
केडगाव प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष बबनराव मेहेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली प्रेस क्लबची वार्षिक सभा रविवार दि. २८ रोजी केडगावमध्ये पार पडली. यावेळी सर्वानुमते नविन कार्यकारिणी निवडण्यात आली.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पत्रकारितेतील मूल्ये, नीतिमत्ता आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन मेहेत्रे यांनी केले. प्रेस क्लबच्या माध्यमातून केडगाव परिसरातील प्रश्न, विकासकामे, सामाजिक उपक्रम आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याची जबाबदारी नूतन कार्यकारिणीवर आहे, असेही त्यांनी नमूद केले.
या निवडीच्या वेळी जेष्ठ पत्रकार व मार्गदर्शक भूषण देशमुख, रामदास नेहुलकर, रविंद्र देशपांडे, समीर मन्यार,नितीन देशमुख, मिलिंद बेंडाळे, अरुण नवथर, जयंत कुलकर्णी, संजय गाडीलकर, रामदास बेंद्रें,गोरख शिंदे ,विक्रम लोखंडे,नरेश रासकर, नागेश सोनवणे , विजय मुळे, प्रवीण सुरवसे, ओंकार देशपांडे, दिगंबर खेत्रे, अनवर मन्यार, सिद्धार्थ दीक्षित, गणेश उनवणे, जीवन म्हस्के, सचिन जगताप, विजय गोबरे, तुषार मरकड, गणेश सोनवणे, संजय कपिले आदी मान्यवर व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी योगेश गुंड म्हणाले केडगाव प्रेस क्लब अधिक सक्रिय, संघटित आणि लोकाभिमुख करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम केले जाईल. पत्रकारांच्या समस्या, प्रशिक्षण, तसेच सामाजिक उपक्रमांवर विशेष भर देण्यात येईल.या निवडीमुळे केडगाव प्रेस क्लबच्या कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.


