Friday, February 20, 2026

माजी आ. स्व.अनिल राठोड यांच्या सूनबाई मनपा निवडणूक लढवणार! वार्डही ठरला…पण ‘चिन्ह’?

नगर: अहिल्या नगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी संपणार असून यावेळी शिवसेनेचे दिवंगत नेते माजी आमदार अनिल राठोड यांच्या कुटुंबातील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. स्व. अनिल राठोड यांच्या सूनबाई तथा युवा सेनेचे विक्रम राठोड यांच्या पत्नी तेजस्विनी विक्रम राठोड या प्रभाग क्रमांक १० मधून उमेदवारी करणार असल्याचे समोर आले आहे. स्वतः विक्रम राठोड यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात फोटोसह पोस्ट केली आहे.

विक्रम राठोड यांनी पोस्टरवर स्व.अनिल राठोड यांचा फोटो वापरला असला तरी त्यांनी कोणत्याही पक्षाचे नाव अथवा चिन्ह याचा उल्लेख केलेला नाही. वास्तविक विक्रम राठोड हे सध्या ठाकरेंच्या शिवसेनेत युवा सेनेचे पदाधिकारी आहेत. मात्र गेल्या काही काळापासून ते नगरमध्ये शिवसेना ठाकरे गटापासून अंतर राखून आहेत असेच चित्र आहे. ठाकरे गटाचे शहरप्रमुख पद किरण काळे यांच्या कडे गेल्यापासून राठोड अलिप्त झाल्याची चर्चा आहे. मध्यंतरी ते पक्षांतर करणार असल्याच्याही चर्चा होत्या. आता मनपा निवडणुकीत लढले तर राठोड ‘मशाल’ हाती घेणार की अन्य चिन्हावर लढणार याबाबतची उत्सुकता वाढली आहे.‌

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles