राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईत मोठा धक्का बसला आहे. त्यांचे सख्खे भाचे आशिष माने यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांच्या उपस्थितीत आशिष माने यांनी प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून चांदिवली मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 159 मधून आशिष माने यांना उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान, महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांना मुंबईत मोठा धक्का बसला आहे. त्यांचे सख्खे भाचे आशिष माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळं मुंबईत महायुतीत दोस्तीत कुस्तीला सुरुवात झाली आहे. एका बाजुला एकानाथ शिंदे यांच्या भाच्याला तर दुसरीकडे भाजपच्या माजी महामंत्री नेहा राठोड यांना देखील राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी देण्याचे ठरवले आहे. दोघांचाही पक्ष प्रवेश करुन तिकीट दिल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे यांचे भाचे आशिष माने यांना 174 मधून तर भाजपच्या माजी महामंत्री नेहा राठोडला 156 मधून उमेदवारी देण्यात आली आहे.
निवडणुकांना अवघे 18 दिवस बाकी आहेत, मात्र अजूनही महायुती, महाआघाड्यांची अधिकृत घोषणा झालेली नाही. ठाकरे बंधुंच्या युतीची घोषणा झाली आहे. जागावाटपचाचं त्रांगडं अजूनही कायम आहे. मुंबई महानगरसह राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी शिंदेंची शिवसेना आणि भाजप एकत्रत लढतील असं चित्र आहे.


