मोठी बातमी…. अखेर काका – पुतणे यांचे ‘राष्ट्रवादी पुन्हा’… स्वतः अजितदादांनी केली घोषणा…

महानगर पालिका निवडणुकीसाठी पुणे, पिंपरी चिंचवड येथे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार अशा चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होत्या. भाजपने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी आघाडी करण्यास नकार दिल्यानंतर ही चर्चा सुरू होती. मात्र अधिकृत घोषणा होत नव्हती. अखेर आज रविवारी सायंकाळी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच दोन राष्ट्रवादी एकत्र येत निवडणुका लढणार असल्याची घोषणा केली.

पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घोषणा केली आहे.खासदार अमोल कोल्हे आणि रोहित पवारांसोबत झालेल्या तीन गुप्त बैठकांमध्ये अजित पवारांची बरीच चर्चा झाली होती. अखेर या बैठकांना आता मूर्तरूप आल्याचं दिसून येत आहे.

अजित पवार यांनी पिंपरीतील भाषणात दत्ता काका साने यांच्या आठवणी जागवल्या आहेत. महापालिकेत रिंग चालली आहे, वारे माप खर्च चालला आहे. जॅकवेल निविदा 30 टक्क्यांनी वाढविण्यात आली. कुदळवाडीत जमिनी बळकावण्यात आल्या आहेत. संत पीठात वारकरी घडवायचे होते, मात्र तिथे संत पिठात सीबीएससी स्कूल सुरू केली आहेत. संत पिठात गीता रामायण शिकवण्यात येत नाही, संत पिठात कंपनी सुरू केली. संत पीठ हे फक्त नावापुरतं राहिलं आहे, असे म्हणत अजित पवारांनी नाव न घेता भाजपवर टीका केली. जे ठरलं होतं ते का थांबवण्यात आलं, वेगळ्या पद्धतीच राजकारण जे चालल ते थांबवायला हवं. पिंपरी चिंचवड शहरातील माझ्या 25 वर्षांच्या राजकारणात मी कधी कर्ज काढलं नव्हतं. आज महापालिकेवर कर्ज झालं आहे, हे पाप कोणाच? असा सवाल करत अजित पवार यांनी नाव न घेता भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या कारभाराकडे लक्ष वेधलं.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles