Saturday, February 21, 2026

नगर महापालिका निवडणूक दिपाली बारस्कर,मीनाताई चोपडा, कुमार सिंह वाकळे–बाबुशेठ नागरगोजे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

अहिल्यानगर महापालिका निवडणूक २०२५; राष्ट्रवादीकडून दिपालीताई बारस्कर यांचा प्रभाग १ मधून उमेदवारी अर्ज दाखल

अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी नगरसेविका दिपालीताई बाळासाहेब बारस्कर यांनी प्रभाग क्रमांक १ मधून आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अधिकृतरीत्या दाखल केला आहे.
शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. प्रभागात गेल्या पंधरा वर्षांच्या कालावधीत राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांचा दाखला देत, नागरिकांचा भक्कम पाठिंबा आपल्याला मिळणार असून विजय निश्चित असल्याचा विश्वास दिपालीताई बारस्कर यांनी व्यक्त केला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत असून, आगामी निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे.

प्रभाग क्रमांक 14 मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मीनाताई संजय चोपडा यांचा उमेदवारी अर्ज दाखल

अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रभाग क्रमांक 14 मधून माजी उपसभापती मीनाताई संजय चोपडा यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अधिकृतरीत्या दाखल केला आहे. अर्ज दाखल करताना पक्षातील वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, किशोर मुनोत, रवींद्र भळगट, अक्षय गांधी, नेहुल भंडारी, मळू गाडळकर, अजय औवसरकर, विजय फुलसौंदर, धनंजय भोसले, मयूर पितळे आणि आशिष गांधी उपस्थिती होते.

मीनाताई संजय चोपडा या अनुभवी नेत्या असून, त्यांच्या कार्यकाळात प्रभागातील विविध नागरी प्रश्नांवर त्यांनी प्रभावी काम केल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे.

प्रभाग क्रमांक ८ मधून राष्ट्रवादीचे कुमार सिंह वाकळे–बाबुशेठ नागरगोजे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रभाग क्रमांक आठमधून माजी सभापती कुमार सिंह वाकळे आणि बाबुशेठ नागरगोजे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या अर्ज दाखल प्रक्रियेदरम्यान मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते.
गेल्या दहा वर्षांत माजी सभापती कुमार सिंह वाकळे यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली प्रभागातील विविध विकासकामांना गती दिली. पायाभूत सुविधा, नागरी सोयी-सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेसह अनेक महत्त्वाच्या कामांमुळे प्रभागाच्या विकासात लक्षणीय बदल झाल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगितले जात आहे.
या विकासकामांच्या जोरावर आणि संघटनात्मक ताकदीच्या बळावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून या निवडणुकीत विजय निश्चित असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles