Saturday, February 21, 2026

Gold Price: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण,जाणून घेऊया १० ग्रॅम सोन्याचा दर

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत वाढ होत होती. सोन्याच्या दरवाढीला अखेर ब्रेक लागला. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ७१० रुपयांनी घसरण झाली आहे. तर १ ग्रॅम चांदीच्या दरात ४ रुपयांनी घसरण झाली आहे. सोन्याचे दर कमी झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आज सोनं-चांदी खरेदी करताना ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार नाही. आज जर तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी जाणार असाल तर आजचे १८, २२ आणि २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर आणि चांदीचे दर किती आहेत ते जाणून घ्या…

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ७१० रुपयांनी घट झाली आहे. २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,४१,७१० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर २४ कॅरेटचे १० तोळा सोने ७१०० रुपयांनी स्वस्त झालं . हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १४,१७,१०० रुपये खर्च करावे लागणार आहेत.

आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ६५० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,२९,९०० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २२ कॅरेटचे १० तोळा सोनं ६५०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १२,९९,००० रुपये खर्च करावे लागणार आहेत. सोन्याचे दर कमी झाल्यामुळे आज सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे.

तर २४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घट झाली आहे. आज १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ५४० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,०६,२८० रुपये खर्च करावे लागतील. तर आज १८ कॅरेटचे १० तोळा सोनं ५४०० रुपयांनी स्वस्त झाले. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १०,६२,८०० रुपये खर्च करावे लागणार आहेत.

दरम्यान, सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे आज सोन्यासोबत चांदी खरेदी करण्याची चांगली संधी आहे. आज १ ग्रॅम चांदीच्या दरात ४ रुपयांनी घसरण झाली आहे. १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला २५८ रुपये खर्च करावे लागणार आहे. तर १ किलो चांदी तब्बल ४,००० रुपयांनी स्वस्त झाली आहे. ही चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला २,५८,००० रुपये खर्च करावे लागणार आहे. त्यामुळे आज चांदी खरेदी करण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles