Saturday, February 21, 2026

संतोष सरवदे यांची दिव्यांग कर्मचारी अधिकारी संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड

संतोष सरवदे यांची दिव्यांग कर्मचारी अधिकारी संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड
नगर: दिव्यांग कर्मचारी अधिकारी संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी श्री. संतोष सरवदे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. ही निवड संस्थापक अध्यक्ष दिगंबर घाडगे पाटील त्याचबरोबर नवनिर्वाचित राज्याध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, राज्य सचिव ॲड. राजेंद्र आंधळे, राज्य कोषाध्यक्ष दिनकर काळे यांनी पत्रकार द्वारे केली.संघटनेच्या 26 डिसें 2025 रोजी नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
सरवदे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर, पदोन्नतीमधील आरक्षण आणि कामाच्या ठिकाणच्या सोयीसुविधांबाबत आक्रमक लढा दिला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन संघटनेने त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे. लवकरच अहमदनगर जिल्ह्याची सहविचार सभा आयोजित करून जिल्हा तालुका कार्यकारणी गठित करून त्याचा अहवाल नाशिक कार्यालयात राज्याध्यक्ष बाळासाहेब सोनवणे यांच्याकडे सादर केला जाईल.
निवडीनंतर बोलताना संतोष सरवदे म्हणाले, “राज्यभरातील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या न्याय्य मागण्या पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन.” त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या राज्य कार्यकारिणीच्या वेळी अहिल्यानगर च्या वतीने बाळासाहेब चव्हाण, अशोक सोनवणे ,श्रीकांत दळवी ,कैलास लेंबे, गजानन मंडलिक, चन्ने, अनिता जंबे ,ज्योती तवले नाशिक येथे उपस्थित होते

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles