Friday, February 27, 2026

मोठी बातमी: मतदानापूर्वीच भाजपचे दोन उमेदवार जिंकले, कमळ फुललं…..

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदानाला अजून 15 दिवस बाकी आहेत. 15 जानेवारीला मतदान तर 16 ला मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता. प्रत्येक पक्षाकडून अर्ज मिळालेल्या उमेदवारांनी काल निवडणुकीसाठी अर्ज भरला, मात्र काहींनी एबी फॉर्म न मिळाल्याने अनेकांची निराशा झाली. काही जण नाराज झाले, तर काही थेट दुसऱ्या पक्षाचीही वाट धरली. निवडणूक उमेदवारी, अर्ज भरण्याची लगबग ही सगळी रणधुमाळी सुरू असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. महानगर पालिकांच्या निवडणुकीत भाजपच्या विजया नारळ फुटला असून सलग दुसरा उमेदवार विजयी झाल्याची माहिती समोर आली आहे.

डोंबिवली : राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या घडामोडी घडल्या. काहींनी उमेदवारी मिळाली नाही म्हणून बंडखोरी केली, तर काहींनी मतदानाआधीच विजय मिळवला. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांसाठी मतदान होण्याआधीच भारतीय जनता पक्षाने आपलं खातं उघडलं आहे. भाजपच्या उमेदवार रेखा चौधरी आणि आसावरी नवरे बिनविरोध निवडून आल्याची आहेत. रेखा चौधरी या दुसऱ्यादा निवडून आल्या आहेत, तर आसावरी नवरे यांची ही पहिलीच टर्म असल्याची माहिती आहे.कल्याण डोंबिवली महापालिकेच्या १२२ जागांसाठी पार पडत असलेल्या निवडणुकीमध्ये भाजपने दोन जागांवर मतदानापूर्वीच ‘कमळ’ फुलवलं. ‘प्रभाग १८ अ’मधून रेखा राजन चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत एकाही विरोधकाकडून त्यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नसल्याने रेखा चौधरींचा विजय निश्चित झाला. तर पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आसावरी नवरे यांनीही विजय मिळवला आहे.

आसावरी केदार नवरे यांनी पॅनल क्रमांक 26 (क) मधून खुल्या प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली आहे. तर रेखा चौधरी यांनी पॅनल क्रमांक 18 (अ) मधून बिनविरोध विजय मिळवला आहे.18 अ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या जागेसाठी रेखा चौधरी यांचा एकच अर्ज दाखल झाला असल्याची माहिती निवडणूक अधिकारी वरुण कुमार सहारे यांनी दिली आहे. त्यामुळं राज्यात भाजप महापालिका निवडणुकीत विजयाचे खाते उघडणार आहे. निकालाआधीच भाजपचा पहिला उमेदवार विजयी होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नांना यश मिळताना दिसत आहे. भाजपच्या रेखा राजन चौधरी या नगरसेविकेची बिनविरोध निवड होणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles