महाराष्ट्रात प्रथमच नगरमध्ये ‘लाडकी मुलगी योजना’…मुलगी झाल्यावर ‘ इतक्या’ रूपयांची ठेव पावती
‘लाडकी मुलगी योजना’ –
महाराष्ट्रात प्रथमच ‘लाडकी मुलगी योजना’ –
अहिल्यानगर -महाराष्ट्रात प्रथमच आई हॉस्पिटलकडून अभिनव सामाजिक उपक्रम
मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या भविष्यास आर्थिक आधार देण्यासाठी आई हॉस्पिटलतर्फे ‘लाडकी मुलगी योजना’ सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात प्रथमच एखाद्या खाजगी हॉस्पिटलकडून राबवली जाणारी ही योजना असून, ही कोणतीही शासकीय योजना नाही, असे हॉस्पिटल प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या योजनेअंतर्गत आई हॉस्पिटलमध्ये प्रसूती झाल्यानंतर मुलगी जन्मल्यास ₹5000/- ची बँक पावती थेट त्या मुलीच्या नावावर दिली जाणार आहे. मुलीच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी ही रक्कम उपयोगी ठरेल, असा डॉ जगदिश भराडिया यांनी विश्वास व्यक्त केला आहे.
हॉस्पिटलमध्ये उपचार व प्रसूतीसाठीचे दरपत्रक (रेट कार्ड) आधीपासूनच निश्चित असून, या योजनेच्या नावाखाली रुग्णांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. त्यामुळे “बिल जास्त घेण्यात येईल” असा कोणताही गैरसमज करू नये, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
ही योजना १ जानेवारी २०२६ ते ३० जून २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.त्यासाठी हॉस्पिटलमध्ये नाव नोंदणी आवश्यक राहील. मुलगी म्हणजे ओझे नसून समाजाचा अभिमान आहे, हा सकारात्मक संदेश समाजात पोहोचवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. मुलींचा सन्मान, शिक्षण व सशक्तीकरणासाठी समाजाने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
आई हॉस्पिटलचा हा उपक्रम समाजात सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.
अधिक माहिती साठी संपर्क-
आई हॉस्पिटल व प्रसूतिगृह
आनंद धाम जवळ ,महात्मा फुले चौक
अहिल्यानगर
9420414646
0241-2414646डून अभिनव सामाजिक उपक्रम

0241-2414646