Tuesday, November 4, 2025

Ahilyanagar crime :सेवानिवृत्त फौजदाराची 77 लाखांची फसवणूक

अहिल्यानगर-पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झालेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय भजनराव सांगळे (वय 62, रा. शिवनगर, सावेडी, अहिल्यानगर) यांची तब्बल 77 लाख रूपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही फसवणूक संजीवन कृषी उद्योग समूहाचे संचालक संदीप रामकिसन फुंदे (रा. पंचवटी, नाशिक) याने गुंतवणुकीतून जादा परतावा देण्याचे आमिषाने केली असल्याचा आरोप सांगळे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत केला आहे.राजेंद्र आश्रुबा शेकडे (रा. भगवानबाबा चौक, निर्मलनगर, सावेडी) या शिक्षकामार्फत सांगळे यांची फुंदे सोबत ओळख झाली होती. सांगळे यांनी सेवानिवृत्तीनंतर मिळालेली रक्कम व घर विक्रीतून मिळालेले पैसे एकूण 77 लाख रूपये फुंदे याच्या व्यवसायात गुंतवले. त्यांना दरमहा 4.5 टक्के परतावा मिळेल, तसेच हवे तेव्हा गुंतवणुक केलेली रक्कम परत मिळेल असे सांगून फुंदे याने विश्वास संपादन केला होता. या व्यवहारासाठी सांगळे यांचा मुलगा राहुल, पत्नी अनिता, मुलगी प्रियंका आव्हाड यांचेही आधार व बँक तपशील घेण्यात आले. सुरूवातीला काही महिन्यांपर्यंत खात्यावर नियमित परतावा जमा होत होता. मात्र, ऑगस्ट 2022 नंतर कोणतीही रक्कम न जमा करता फुंदे याने फोन बंद केला व संपर्क टाळू लागला. पैसे परत मागितल्यावर तुमचे पैसे सुरक्षित आहेत, अजून थांबा असे सांगत वेळकाढूपणा करत शेवटी कुठलाही प्रतिसाद न देता विश्वासघात केला.

फिर्यादी विजय सांगळे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, फुंदे याने हेतूपुरस्सर गुंतवणुकीच्या नावाखाली पैसे उकळून फसवणूक केली असून इतरही लोकांकडून पैसे घेतल्याचे समजते. त्यामुळे आणखी काही व्यक्तीची यामध्ये फसवणूक असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणूक आणि विश्वासघात सह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वलसिंह रजपुत करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles