Saturday, February 21, 2026

अहिल्यानगर शहरात तरुणावर धारदार शास्राने सपासप वार

तरुणावर धारदार शास्राने सपासप वार
अहिल्यानगर शहरात – घरासमोर दारू पिण्यास विरोध केल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तरुणावर धारदार शास्राने सपासप वार केल्याची घटना रेल्वे स्टेशन भागातील इंगळे वस्ती परिसरात घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी संशयित आरोपी फिर्यादीच्या घरासमोर दारू पिण्यासाठी बसले होते. त्यावेळी फिर्यादीने त्यांना सार्वजनिक ठिकाणी दारू न पिण्याबाबत समज दिली होती. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीला गाठले. आम्ही दारू पीत असताना तू आम्हाला शिव्या का दिल्या? असा जाब विचारत आरोपींनी धारदार शास्राने सपासप वार करून गंभीर जखमी केले.​रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या फिर्यादीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

भरदिवसा दोन ठिकाणी घरफोडी; सात लाखांचा ऐवज लंपास
जिल्ह्यातील एमआयडीसी परिसरातील पितळे कॉलनी तसेच अरणगाव परिसरात घरफोडीचा दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. भरदुपारी चोरट्यांनी दोन्ही ठिकाणी घर फोडी करुन जवळपास ७ लाखांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तसेच नगर तालुका पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहे. पितळे कॉलनीतील फिर्यादी महिला २९ डिसेंबर रोजी सकाळी घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य गेटचे कुलूप तोडून प्रवेश केला. घरातील ७२ हजार ६०० रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरून नेले. तसेच अरणगाव येथील व्हीआरडीई परिसरात राहणाऱ्या फिर्यादी महिला कर्मचारी आपल्या घराला कुलूप लावून उरुळी कांचन (पुणे) येथे परमहंस महाराज सत्संग कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. हीच संधी साधून अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडले. चोरट्याने घरातील सामानाची उचकापाचक करून ५० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन बांगड्या आणि ३० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी (चेन), असा ऐवज लंपास केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles