Friday, February 20, 2026

श्रीरामपूर हादरले! बंटी जहागीरदार यांच्यावर भररस्त्यात गोळीबार

श्रीरामपूर शहरात आज दुपारी गोळीबाराची एक थरारक घटना घडली आहे. शहरातील प्रसिद्ध व्यक्ती बंटी जहागीरदार यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला असून, या घटनेमुळे संपूर्ण शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बंटी जहागीरदार हे कब्रस्तानातून आपले काम आटोपून परतत होते. तेथून बाहेर पडल्यानंतर जर्मन हॉस्पिटलसमोरील मुख्य गेटजवळ दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक गोळ्या झाडल्या. गोळीबाराचा आवाज होताच परिसरात एकच पळापळ झाली. हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून पोलीस सध्या त्यांचा शोध घेत आहेत.गोळीबारात जखमी झालेल्या बंटी जहागीरदार यांना तातडीने उपचारासाठी कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर वैद्यकीय पथकाकडून उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे सावट पसरले असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली जात आहे.

ऑगस्ट २०१२ मध्ये पुण्यात जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या स्फोटाच्या गुन्ह्यात बंटी जहागिरदार याला अटक करण्यात आली होती. याशिवाय श्रीरामपूरमध्ये इतरही गुन्हे दाखल असल्याने त्याला अनेकदा तडीपार करण्यात आले होते. पूर्वी राजकारणातही सक्रीय असल्याने आजचा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles