नगरमध्ये शिंदे गटाला धक्का, ५ उमेदवारांचे अर्ज बाद ; मतदाना आधीच राष्ट्रवादी खाते उघडणार ! कुमारसिंह वाकळे बिनविरोध ?

अहिल्यानगर – महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १७ प्रभागांतील ६८ जागांसाठी इच्छुक उमेदवारांनी तब्बल ७८८ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. ३१ डिसेंबर रोजी विविध ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांसमोर उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. या छाननीत ७८८ पैकी १७ उमेदवारी अर्ज अवैध ठरवत बाद करण्यात आले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.
प्रभाग ८ ड मध्ये कुमार वाकळे यांचा एकमेव अर्ज,अपक्ष कोलते यांची माघार

प्रभाग क्रमांक आठची अर्ज छाननी नंतर वैद्य झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर झाली असून प्रभाग क्रमांक आठ मधील ड सर्वसाधारण
प्रवर्गात फक्त दोन उमेदवार राहिले होते त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वाकळे कुमार बबनराव आणि अपक्ष कोलते मुरलीधर रामा या दोघांचे अर्ज मागे राहिले होते आज सकाळी कोलते मुरलीधर रामा यांनी अर्ज मागे घेतला असून या ठिकाणी फक्त कुमार वाकळे यांचा अर्ज राहिला असल्याने ते बिनविरोध निवडणून येतील

प्रभाग आठमधील शिंदेसेनेचे उमेदवार राहुल कातोरे यांच्या उमेदवारी अर्जावरील अनुमोदकाच्या स्वाक्षरीवर आक्षेप घेण्यात आला. अनुमोदकाच्या स्वाक्षरीची प्रत्यक्ष पडताळणी झाल्यानंतर ती चुकीची असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला. त्यांनी अपक्ष अर्ज भरलेला नव्हता. प्रभाग ६ मध्ये विशाल शितोळे यांनी एबी फॉर्म जोडलेला नसल्याने त्यांचा शिंदेसेनेकडून उमेदवारीचा अर्ज अवैध ठरला तर त्यांचा अपक्ष अर्ज वैध ठरला. प्रभाग ६ मधील उमेदवार अमित खामकर यांनी एबी फॉर्मची झेरॉक्स प्रत जोडल्याने त्यांचा शिंदेसेनेचा उमेदवारी अर्ज बाद झाला. त्यांचा अपक्ष अर्ज वैध ठरला. प्रभाग १६ मध्ये हर्षवर्धन कोतकर यांच्या एबी फॉर्ममध्ये खाडाखोड असल्याने त्यांचा शिंदेसेनेकडील अर्ज अवैध ठरवण्यात आला. अपक्ष अर्ज वैध ठरला. प्रभाग १७ मध्ये गौरी नन्नावरे यांच्या एबी फॉर्ममध्ये खाडाखोड असल्याने त्यांचा शिंदेसेनेचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला. अपक्ष अर्ज वैध ठरला.याशिवाय प्रभाग ८ मधील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नूरखा फत्तेखा पठाण यांच्या उमेदवारी अर्जावरील सूचक अन्य प्रभागातील असल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरला.

छाननीमध्ये आमचे जे उमेदवार बाद ठरले आहेत व ज्यांचे अपक्ष उमेदवार अर्ज आहेत त्यांना तसेच ज्यांनी आमच्याकडे उमेदवारीची मागणी केली होती मात्र, ऐनवेळी आम्ही त्यांना उमेदवारी देऊ शकलो नाही त्यांना आमच्या पक्षाच्यावतीने पुरस्कृत केले जाणार असल्याचे शिंदेसेनेचे शहरप्रमुख सचिन जाधव यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles