Friday, February 27, 2026

करूणा मुंडे यांची ‘ती’ याचिका न्यायालयाने फेटाळली, धनंजय मुंडेंना दिलासा

माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात करुणा मुंडे यांनी दाखल केलेली याचिका परळीच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकऱ्यांनी बुधवारी फेटाळली. धनंजय मुंडे यांनी पत्नी म्हणून आपल्या नावाचा उल्लेख त्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या नामनिर्देशनपत्रासोबत जोडलेल्या शपथपत्रात टाळला असून खोटी माहिती सादर केल्याप्रकरणी त्यांची निवडणूक रद्द करावी, अशी मागणी केली होती.

या प्रकरणी करूणा मुंडे यांनी लोकप्रतिनिधी अधिनियम कायद्याच्या अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यावरील सुनावणी परळीच्या प्रथमवर्ग न्यायालयात पार पडली. या प्रकरणात दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाल्यानंतर करुणा शर्मा मुंडे यांची तक्रार परळी न्यायालयाने फेटाळली आहे.

मात्र, करुणा मुंडे यांच्या पोटगीशी संबंधित अन्य एका प्रकरणात करुणा मुंडे यांना दिलासा मिळाला होता. करुणा मुंडे यांनी त्या माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचा दावा केलेला असून, या प्रकरणात त्यांना व त्यांच्या मुलीसाठी करावयाच्या खर्चासाठी पोटगी देण्याचे आदेश धनंजय मुंडे यांना दिले आहेत. या प्रकरणात वरिष्ठ न्यायालयात धनंजय मुंडे यांनी धाव घेतल्यानंतर तेथेही त्यांची याचिका फेटाळली होती. धनंजय मुंडे यांनी आपला मानसिक छळ केला, असा आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles