समाजमाध्यमांवर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक डान्स व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी अतिशय सुरेख असा डान्स करताना दिसत आहे. हा डान्सचा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. तुम्ही आजवर अनेक डान्स व्हिडीओ पाहिले असेल पण या तरुणाने सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे.
सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. त्यात मजेशीर, तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. डान्स करणे हा अनेकांसाठी एक उत्तम विरंगुळा असतो. डान्स केल्यावर शरीराचा व्यायाम तर होतोच; पण मनही शांत होते. डान्सची असणारी आवड त्यांना शांत बसू देत नाही. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही तुम्हाला असंच काहीतरी पाहायला मिळेल.
हल्ली सतत बॉलीवूडमधील नवी-जुनी गाणी पुन्हा पुन्हा चर्चेत येत असतात. या गाण्यांवर लहानांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण जमेल तसा डान्स करतो. त्यातील काही व्हिडीओ खूप चर्चेतही येतात. सध्या एका तरुणीचा डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात एक तरुणी खूप सुंदर डान्स करताना दिसतेय.या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी ‘हमको आजकल है इंतजार’या हिंदी गाण्यावर सुंदर डान्स करत आहेत. यावेळी त्या करत असलेल्या एकापेक्षा एक भारी डान्स स्टेप्स अन् त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही त्यांचे कौतुक कराल. त्यांचा हा डान्स सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @lavanya.das_ या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.


