डान्स करणं ही अनेकांची आवडती कला आहे. त्यामुळे हौशी कलाकार डान्स करण्याची संधी मिळेल तिथे आपली हौस पूर्ण करून घेतात. एखाद लग्न, साखरपुडा, वरात किंवा वाढदिवस असो डान्सची आवड असणारे मनमुराद नाचतात. सोशल मीडियामुळे या हौशी कलाकारांचे आयुष्य बदलू लागले आहे. विविध व्हायरल गाण्यांवर डान्स करून ते सोशल मीडियावर खूप प्रसिद्धी मिळवू लागले आहेत. दरम्यान, सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून सोशल मीडियावर लग्नातील हटके रील्स, व्हिडीओ आणि फोटो सतत व्हायरल होत असतात. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये लग्नातील अनेक गमतीजमती, अनोख्या प्रथा, हटके उखाणे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक भन्नाट व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
लग्न असो किंवा साखरपुडा हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात खूप सुंदर आणि आयुष्य बदलणारा क्षण असतो, त्यामुळे या दिवशी वधू आणि वर त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहतील अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. सुंदर कपडे, दागिने, मेकअप यासह डान्स, फोटोशूट अशा अनेक गोष्टींची आधीपासून तयारी केली जाते. आजपर्यंत अनेक लग्नांमधील आणि साखपुड्यातील काही हटके व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या पाहिले असतील. आतादेखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, साखरपुड्याच्या दिवशी वधूने सुंदर गुलाबी रंगाची साडी नेसली असून त्या साडीला सूट होईल असा मेकअप आणि दागिणे परिधान केले आहेत. स्टेजवर वधू वरासाठी “मी स्वामिनी तुझी प्रिया रे” या मराठी मालिकेच्या शीर्षक गीतावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी तिच्या डान्स स्टेप्स अन् चेहऱ्यावरील हावभावही लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.
व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @nilamsutar या अकाउंटवर शेअर केला आहे.


