पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला जाहीरनामा सादर करताना पुणेकरांना मोठी आश्वासने दिली आहेत. शहराची वाहतूक कोंडी आणि वाढते प्रदूषण यावर जालीम उपाय म्हणून त्यांनी पुणेकरांना मोफत मेट्रो आणि मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला आहे.
शहरातील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे दररोज साडेसात कोटी रुपये इंधनापोटी खर्च होतात, ज्याचा वार्षिक आकडा १०,८०० कोटींच्या घरात जातो. हा अवाढव्य खर्च वाचवून तो सार्वजनिक वाहतुकीकडे वळवल्यास रस्त्यावरील खाजगी वाहनांची गर्दी कमी होईल आणि पुणे प्रदुषणमुक्त होईल, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला. तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतरच हा व्यावहारिक प्लॅन मांडला असून, महापालिकेत सत्ता दिल्यास ही मोफत सेवा प्रत्यक्षात आणून दाखवू, असंही अजित पवार म्हणाले.
५०० स्क्वेअर फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून पूर्ण सवलत देण्याचे आश्वासन पवारांनी दिले आहे. तसेच, संपूर्ण पुणे शहर टँकरमुक्त करणे, विद्यार्थ्यांना मोफत टॅब पुरवणे, शहरातील अपूर्ण रस्ते (मिसिंग लिंक्स) पूर्ण करणे आणि कचऱ्याचे १०० टक्के वर्गीकरण करण्यावर त्यांनी भर दिला आहे.

पालिका निवडणुकीच्या प्रचारसभांसाठी अजित पवार ठाण मांडून बसले आहेत. रॅली, प्रचारसभांना अजित पवार होते. पण सुप्रिया सुळे कुठेच दिसल्या नाहीत, असं का? असा प्रश्न सुप्रिया सुळेंना पत्रकारांनी विचारला. त्यांच्या प्रश्नावर अजित पवारांनी लागलीच उत्तर दिलं. ते म्हणाले, “तिने मला सांगितलं की दादा तू मोठा भाऊ आहेस, तू पळायचं. मी तुझ्या पाठीशी मी आहेच.” अजित पवार असं उत्तर देत असतानाच सुप्रिया सुळेंनाही हसू आवरता आलं नाही.