अहिल्यानगर बदलणार आहे….‘मविआ’च्या ‘निश्चयनामा’चे आज प्रकाशन
नगर : अहिल्यानगर बदलणार आहे कारण आता निर्णय शब्दांत नाही निश्चयात होणार आहे, अशी ग्वाही देत अहिल्यानगर शहरासाठी महाविकास आघाडीने निश्चयनामा 2026 तयार केला आहे. शनिवारी 10 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता या निश्चयनामाचे प्रकाशन प्रोफेसर कॉलनी चौकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या साक्षीने होणार आहे. यावेळी खा.निलेश लंके, आ.रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आ.दादाभाऊ कळमकर, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, माजी महापौर अभिषेक कळमकर, शिवसेना ठाकरे गटाचे किरण काळे राजेंद्र दळवी यांच्यासह तीनही पक्षांचे पदाधिकारी, सर्व उमेदवार उपस्थित राहणार आहेत.
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जोरदार प्रचार यंत्रणा सक्रिय केली आहे. शहराच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही मविआने दिली आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासनासाठी कटिबध्द असल्याचे मविआच्यावतीने सांगण्यात आले.


