लग्न असो किंवा एंगेजमेंट; भारतीय समारंभ म्हणजे नुसता विधी नाही, तर आनंद, गाणी, हशा आणि डान्सचा जल्लोष असतो. अशा कार्यक्रमात कधी कधी असा एखादा क्षण घडतो की, तो संपूर्ण फंक्शनच खास बनवतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक क्षण चर्चेत आहे. एका एंगेजमेंट फंक्शनमध्ये एका काकूंनी असा भन्नाट डान्स केला की, उपस्थित पाहुणेच नाही, तर लाखो नेटिझन्सही थक्क झाले. साधेपणा, आत्मविश्वास व जबरदस्त हावभाव असलेला हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ एका एंगेजमेंट समारंभातील आहे. स्टेजवर नवरी-नवरदेव बसलेले असताना, त्यांच्यासमोर साडी नेसलेली एक महिला डान्स करताना दिसते. ही महिला म्हणजे घरातील काकू असल्याचे सांगितले जाते. कोणताही दिखावा नाही, भारी कपडे नाहीत; पण तरीही तिच्या डान्सने सगळ्यांचे लक्ष स्वतःकडे खेचून घेतले.
व्हिडीओमध्ये स्टेज सजवला आहे. मागे कुटुंबीय आणि पाहुणे उभे आहेत; तर समोर काकूबाई संपूर्ण आत्मविश्वासाने डान्स करीत आहेत. साडीतील त्यांची हालचाल, हातवारे, चेहऱ्यावरील भाव आणि खास करून त्या लावत असलेले ठुमके हे पाहून कुणालाही वाटेल की, त्या प्रोफेशनल डान्सर आहेत. त्यांच्या प्रत्येक स्टेपमध्ये एक सहजता आहे. त्या डान्स करताना अजिबात तणावात नाहीत; उलट तो क्षण त्या मनापासून एंजॉय करत आहेत, हे स्पष्ट दिसतं. त्यामुळेच उपस्थित सगळेच जण त्यांच्याकडे पाहत राहतात.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर artandmotiondancecompany या अकाउंटवरून शेअर करण्यात आला


