ठाणे महापालिकेचा निकाल जाहीर झाला आहे. ठाणे महापालिकेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला घसघशीत यश मिळालं आहे. त्यामुळे शिंदे गटाचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेनेच्या फुटीनंतरची ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीत काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. शिवसेना फुटीचा फायदा थेट भाजपला होणार असल्याचंही सांगितलं जात होतं. पण त्याचा काहीच फरक पडलेला दिसत नाहीये. या निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का दिला आहे. ठाणे महापालिकेत विरोधी बाकांवर बसण्याचा इशाराच भाजपने शिंदे यांना दिला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे एकत्रितपणे निवडणूक लढवल्यानंतर भाजपने हा इशारा दिल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
ठाणे महापालिकेच्या 131 जागांपैकी शिंदे गटाला 75 तर भाजपला अवघ्या 28 जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होती. तरीही भाजपला अपेक्षित यश गाठता आलेलं नाही. मात्र, निवडणूक संपताच भाजपने वेगळी भूमिका घेण्याचा विचार सुरू केला आहे. योग्य मानसन्मान न मिळाल्यास आम्ही वेगळा विचार करू, असा इशाराच भाजपचे आमदार संजय केळकर यांनी दिला आहे. केळकर यांच्या या इशाऱ्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेची युती ठाण्यात तुटणार असल्याचे संकेत मिळत आहेत.ठाणे महापालिकेचा निकाल जाहीर झाला आहे. ठाणे महापालिकेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला घसघशीत यश मिळालं आहे. त्यामुळे शिंदे गटाचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेनेच्या फुटीनंतरची ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीत काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. शिवसेना फुटीचा फायदा थेट भाजपला होणार असल्याचंही सांगितलं जात होतं. पण त्याचा काहीच फरक पडलेला दिसत नाहीये. या निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का दिला आहे. ठाणे महापालिकेत विरोधी बाकांवर बसण्याचा इशाराच भाजपने शिंदे यांना दिला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे एकत्रितपणे निवडणूक लढवल्यानंतर भाजपने हा इशारा दिल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
ठाणे महापालिकेच्या 131 जागांपैकी शिंदे गटाला 75 तर भाजपला अवघ्या 28 जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होती. तरीही भाजपला अपेक्षित यश गाठता आलेलं नाही. मात्र, निवडणूक संपताच भाजपने वेगळी भूमिका घेण्याचा विचार सुरू केला आहे. योग्य मानसन्मान न मिळाल्यास आम्ही वेगळा विचार करू, असा इशाराच भाजपचे आमदार संजय केळकर यांनी दिला आहे. केळकर यांच्या या इशाऱ्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेची युती ठाण्यात तुटणार असल्याचे संकेत मिळत आहेत.


