काटा किर्रर्रर्र… ढोलकीच्या तालावर महिलेने धरला अस्सल ठेका; व्हिडीओ होतोय व्हायरल

हल्ली सतत अनेक नवी-जुनी गाणी पुन्हा पुन्हा चर्चेत येत असतात. या गाण्यांवर लहानांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण जमेल तसा डान्स करतो. त्यातील काही व्हिडीओ खूप चर्चेतही येतात. सध्या एका महिलेचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात एक तरुणी खूप लावणी करताना दिसतेय.

समाज माध्यमांवर कधी डान्स, तर कधी गाणी, कधी अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. त्यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की, ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं.

लावणी हा आपल्या महाराष्ट्रातील लोकप्रिय लोककलेचा प्रकार आहे. महाराष्ट्राची शान म्हणून लावणी नृत्य ओळखले जाते. त्यामध्ये संगीत, नृत्य व गीत यांचा मिलाफ साधलेला असतो. लावणी नृत्यामध्ये कलाकार पायांत घुंगरू बांधून, ढोलकीच्या तालावर ते सादर करतात. सोशल मीडियावर अनेक जण ही मराठी लोककला सादर करताना दिसतात. लावणीच्या विविध गाण्यांवर नृत्य करताना दिसतात. दरम्यान, आता एका महिलेचा सादर केलेल्या लावणीचा एक जबरदस्त व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.हल्ली सोशल मीडियावर अनेक महिला कलाकारांच्या लावणी नृत्याचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. परंतु, या व्हिडीओंपैकी काही व्हिडीओंमध्ये काही महिला लावणीच्या नावाखाली त्यांच्या नृत्यातून केवळ अश्लील हावभावच दाखविताना दिसतात. फार कमी महिला त्यांच्या व्हिडीओतून साध्या व सुंदर पद्धतीने पारंपरिक लावणी सादर करतात; ज्यात कोणत्याही अश्लीलतेऐवजी सुंदर हावभाव आणि स्टेप्स पाहायला मिळतात.


या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला तिच्या घरामध्ये लावणीचा तोडा सादर करत आहे. ढोलकीच्या तालवर महिलेच्या भन्नाट स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होतोय.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @suvarnakale333 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles