“भानुदास कोतकर” नाव काढून टाकण्याचा आदेश
अहिल्यानगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नेप्ती उपबाजार समितीला “भानुदासजी एकनाथ कोतकर उपबाजार समिती” असे नाव देण्यात आले होते. २०२४ मध्ये अनेक नेत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला होता.
याला अमोल येवले यांनी हरकत घेत उपनिबंधक कार्यालयात तक्रार केली. असे नाव देणे बेकायदेशीर असल्याने ते रद्द करून फलक काढण्याचा आदेश विविध यंत्रणानी दिला. मात्र त्याची अंमलबजावणी होत नव्हती. त्यामुळे येवले यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
आता हे नाव काढण्याच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी सहा आठवड्यात करण्याचे आदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विभा कंकणवाडी व हितेन वणेगावकर यांनी दिले आहेत.
मधल्या काळात महापालिका निवडणूक झाली. त्यात अमोल येवले निवडून आले आहेत.
नगर तालुका नेप्ती उपबाजार समितीला भानुदास कोतकर नाव काढून टाकण्याचा आदेश
- Advertisement -


