Sunday, February 22, 2026

ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्थेत सभासदांसाठी विमा कवच ,कर्ज मर्यादेत वाढ : सुनील नागरे

अहिल्यानगर जिल्हा ग्राम पंचायत अधिकारी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना कर्ज वितरणातवाढ व विमा कवच.

ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्थेत सभासदांसाठी कर्ज मर्यादेत वाढ : सुनील नागरे
नगर : ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्था ग्राम पंचायत अधिकाऱ्यांची कामधेनु असून संस्थेला 56 वर्षाची यशस्वी परंपरा आहे. एकच ध्यास सभासदांचा विकास या ध्येय धोरणानुसार नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सभासदांसाठी तीस लाखांवरून 45 लाख वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच सभासदांसाठी 25 लाखांवरून चाळीस लाख विमा कवच वाढ करण्यात आली अहिल्यानगर जिल्हा ग्राम पंचायत अधिकारी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सुनील नागरे यांच्या अध्यक्षतेखाली मंजुरी देण्यात आली.

जिल्हाध्यक्ष युवराज पाटील, जिल्हा सरचिटणीस अशोक नरसाळे, व्हा. चेअरमन सुनील वाघ, मानद सचिव सविता भाकरे, सुरेश मंडलिक, संचालक सतिश मोटै, दिलीप नागरगोजे, शामराव भोसले, मंगेश पुंड, रूबाब पटेल, किसन भिंगारदे, उध्दव जाधोर, संदीप लगड, वाळू मुंढे, भगवान खेडकर, रामदास गोरे, नारायण खेडकर, अशोक खळेकर, भाऊसाहेब गायकवाड,राणी वाघ,तज्ज्ञ संचालक मधुकर जाधव, एकनाथ ढाकणे, लक्ष्मण नागरे, पसंस्थेचे व्यवस्थापक प्रदीप कल्याणकर, वरिष्ठ सहायक नफीसखान पठाण आदी उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष युवराज पाटील म्हणाले भरभक्कम आर्थिक स्थिती असलेल्या संस्थेत सभासद व नागरिकांना मुदत ठेवींवर 10 टक्के व जेष्ठ नागरिकांसाठी साडेदहा टक्के व्याजदर दिला जातो. याचा नागरिकांनी तसेच सभासदांनी अवश्य लाभ घ्यावा. संस्थेमार्फत वर्षभर विविध उपक्रम, कार्यक्रम घेतले जातात. प्रत्येक कार्यक्रमाला सभासदांचे भक्कम पाठबळ मिळत असते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles