Wednesday, February 25, 2026

राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय ; लाडक्या बहिणींची घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी होणार

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले होते. अनेक महिलांनी केवायसी करुनदेखील त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, आता लाडक्या बहि‍णींची पडताळणी करण्याच्या केवायसीबाबत पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आले आहे.

लाडकी बहीण योजनेत अनेक महिला निकषात असूनदेखील केवायसीतील काही अडचणींमुळे त्यांचा लाभ बंद झाला आहे. यामुळेच योजनेच्या निकषानुसार लाभार्थ्यांना अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी याबाबत माहिती दिली आहे.लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ होती. तोपर्यंत महिलांनी केवायसी केली आहे. तरीही अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे महिलांनी मुख्यमंत्र्‍यांनादेखील पत्र लिहलं होतं. याच पार्श्वभूमीवर आता सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना : महत्वाची सूचना !

महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक ३१ डिसेंबर…

लाडकी बहीण योजनेसाठी काही निकष ठरवून देण्यात आले आहेत. या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. यामध्ये २१ ते ६० वयोगटातील महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे, चारचाकी वाहन नसावे. या सर्व निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles