अहिल्यानगर शहरातील एका २३ वर्षीय विवाहित महिलेचा एका नराधमाने घरात शिरून विनयभंग केला. या घटनेने चांगलीच खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी (दि. १७) रात्री साडेदहा सुमारास घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी सदरचा गुन्हा पुणे ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार दि १७ जानेवारी रोजी पिडीत महिला तिच्या लहान मुलासह हॉलमध्ये झोपलेली होती. यावेळी नराधम आरोपीने फिर्यादीच्या अंथरुणात प्रवेश केला. बळजबरीने झटपट करत ओढले. तसेच आरडाओरडा कला तर ठार मारेन अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या अनपेक्षित प्रकारामुळे पिडीत महिला प्रचंड घाबरली होती. या प्रकरणाचा अधिक तपास आता पुणे ग्रामीण पोलीस करत आहेत. समाजातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
एका सेवानिवृत्त व्यक्तीचे बंद घर अज्ञात इसमा फोडले. २५ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. याप्रकरणी प्रदीप गोविंद मकासरे ( रा. विद्यानगर परिसर दौंड रोड, जि. ता. अहिल्यानगर ) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सेवानिवृत्त प्रदीप मकासरे कटूंबासह विद्यानगर भागात वास्तव्यास आहे. दि. ७ जानेवारी रोजी मकासरे दाम्पत्य पुण्यात मुलाकडे गेले होते. जाताना त्यांनी शेजारी राहणाऱ्या सुधाकर मांढरे यांना आपण बाहेर गावी जात असल्याचे कळवले होते. दि. १९ जानेवारी रोजी सकाळी शेजाऱ्यांनी मकासरे यांना फोन करून घरातील दिवे चालू असल्याचे विचारले. संशय आल्याने मकासरे पती-पत्नी तातडीने अहिल्यानगरला परतले. दुपारी घरी आल्यावर त्यांना दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. घरात प्रवेश केला असता सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते. बेडमध्ये ठेवलेली ५०० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपातील २५ हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कोतवाली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.


