Saturday, February 21, 2026

झेडपीच्या मतदानाआधीच भाजपने खातं उघडलं, उमेदवाराचा बिनविरोध विजय

नगरपरिषदा, महापालिका निवडणुकीतील बिनविरोधचा ट्रेंड आता जिल्हा परिषद अन् पंचायत समितीच्या निवडणुकीतही कायम राहिलाय. मतदानाआधीच पंचायत समितीमध्ये भाजपने विजयाचे खाते उघडलेय. सिंधुदुर्गातील वैभाववाडीमध्ये भाजपच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाली आहे. बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे कोकीसरे मतदारसंघातून भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे यांच्या पत्नी साधना सुधीर नकाशे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे भाजपने वैभववाडी पंचायत समितीत आपले खाते उघडले. हा विजय केलेल्या विकास कामांचा विजय असल्याची भावना यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे यांनी व्यक्त केली आहे. वैभववाडी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने मोठी मुसंडी मारली आहे. कोकिसरे पंचायत समिती मतदारसंघातून केवळ भाजपचाच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने भाजपच्या अधिकृत उमेदवार साधना सुधीर नकाशे यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर जिल्ह्यात भाजपची ही पहिलीच बिनविरोध एन्ट्री ठरल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी वैभववाडीत बुधवारी मोठी गर्दी झाली होती. कोकिसरे मतदारसंघातून भाजपतर्फे साधना सुधीर नकाशे यांनी दोन अर्ज भरले होते, तर अक्षता सूर्यकांत डाफळे यांनी भाजपचा डमी अर्ज सादर केला होता. विशेष म्हणजे, या मतदारसंघातून ठाकरे सेना मनसे किंवा काँग्रेस यापैकी कोणत्याही पक्षाने आपला उमेदवार रिंगणात उतरवला नाही. इतर कोणत्याही पक्षाचा किंवा अपक्षाचा अर्ज न आल्याने नकाशे यांची बिनविरोध निवड आता निश्चित झाली आहे.

या विजयाची बातमी समजताच वैभववाडीतील भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. भाजप कार्यालयासमोर फटाक्यांची आतिशबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी भाजपचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नकाशे यांच्या रूपाने भाजपने निवडणुकीच्या रिंगणात विजयाचे खाते उघडल्याने संपूर्ण तालुक्यात सध्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles