Friday, February 20, 2026

उपमुख्यमंत्री अजित पवारांची राष्ट्रवादी सत्तेतून बाहेर पडणार ! बड्या नेत्याचं वक्तव्य

शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊतांनी महत्त्वाचे विधान केले असून भविष्यात शरद पवार आणि अजित पवार हे दोघे महाविकास आघाडीमध्ये दिसतील असे ते म्हणाले आहेत.

संजय राऊत म्हणाले की, “मी असा विचार करतो की, शरद पवार हे अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील. कारण शरद पवार हे आमच्याबरोबर आहेत. त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहेत. अजित पवार हे महायुतीमध्ये आहेत, तरीही त्यांनी महाविकास आघाडीबरोबर पाट लावलेला आहे. अशा वेळी त्यांच्यावर तिथे (महायुतीत) कारवाई होईल. मला अशी खात्री आहे की भविष्यामध्ये शरद पवार-अजित पवार एकत्रित महाविकास आघाडीत दिसतील.”

अजित पवार सरकारमधून बाहेर पडतील? असा प्रश्न विचारला असता, संजय राऊत म्हणाले की, “त्यांना बाहेर पडावे लागेल. एकावेळी दोन दगडांवर पाय कसे ठेवणार? त्यांना काहीतरी एक सोडावं लागेल किंवा काहीतरी एक स्वीकारावं लागेल,” असे संजय राऊत म्हणाले.

छगन भुजबळ यांच्याविरोधात किती बोंबा मारल्या. छगन भुजबळ अडीच वर्ष जेलमध्ये राहिले. पण आज भुजबळ सर्व प्रकरणात निर्दोष असल्याचा निकाल दिला. याबद्दल या राज्याच्या गृहखात्याने आणि ईडी प्रायश्चित्त घेतलं पाहिजे असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

अजित पवारांची राष्ट्रवादी भविष्यात फुटू शकते का? यावर बोलताना राऊत म्हणाले की, “अजित पवार त्यांच्या पक्षासह आज शरद पवारांबरोबर युती करत आहेत. म्हणजे त्यांचं मन कुठे आहे? त्यांचं मन मूळ कुटुंबाकडे आहे. त्यामुळे अख्खं कुटुंब महाविकास आघाडीत सामील होईल,” असे संजय राऊत म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles