Thursday, February 19, 2026

मसाज सेशन रद्द…महिला ग्राहक व थेरपिस्टमध्ये जोरदार मारामारी, VIDEO

व्हिडीओ वडाळा येथील एका घरात घडलेल्या गोंधळाचा आहे. कंपनीकडून आलेली मसाज थेरपिस्ट आणि घरातील महिला यांच्यात झालेल्या जोरदार वादाचे दृश्य या व्हिडीओत दिसते. मसाज सेशन रद्द केल्यावर थेरपिस्ट घर सोडण्यास नकार देत असल्यामुळे हा वाद वाढल्याचे सांगितले जात आहे.

वडाळा पूर्व भागात राहणाऱ्या ४६ वर्षांच्या एका महिलेने मसाज सेशन रद्द केल्यामुळे तिला थेट तिच्या घरातच मसाज थेरपिस्टने मारहाण केल्याचा आरोप केला गेला आहे. या घटनेसंबंधीचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला असून, तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुरुवातीला त्या दोघींमध्ये छोट्या प्रमाणात वाद झाला; पण नंतर तो इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला की, ते प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. त्या घटनेनंतर अर्बन कंपनीने संबंधित मसाज थेरपिस्ट व्यक्तीला नोकरीतून दूर केले आहे.

https://x.com/ankitgpt334/status/2014677890429026488?s=20

व्हायरल व्हिडीओत मसाज थेरपिस्ट फोन मध्ये शूट करत असते घरातील बेडरूममध्ये उभी असल्याचे दिसतं. घरमालक महिला तिला नीटपणे घराबाहेर जाण्यास सांगत आहेत. त्यावर “घरात उभी राहून बदतमीजी करू नकोस,” असं ती थेरपिस्ट म्हणताना दिसते. दोघींमध्ये बॅग खेचण्यावरून ओढाताण होते आणि काही क्षणांतच हा शाब्दिक वाद मारामारीत रूपांतरीत होतो.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles