Friday, February 20, 2026

महापौर भाजपचाच होईल, अन्यथा विरोधात बसू…बड्या नेत्याचा इशारा

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक 89 जागा जिंकून भाजप आपल्या स्वप्नाच्या जवळ पोहोचला असला तरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत अद्याप एकमत न झाल्याने मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मुंबईत महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली असून सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालं आहे. त्यामुळे, मुंबई महापालिकेत महापौर भाजपचा होणार की शिवसेनेचा हा प्रश्न अद्याप कायम आहे, कारण याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. केवळ महायुतीचा महापौर होईल, असे सांगितले जात आहे. मात्र, आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महापौर भाजपचाच (BJP) होईल, अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

मुंबईच्या महापौरपदावर भाजपने दावा केला असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही महापौर किंवा स्थायी समिती अध्यक्षपदावर दावा केला आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांतील अंतर्गत चर्चा आणि वाद मिटल्याशिवाय एकत्रित गटनोंदणी होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे गटनोंदणी पूर्ण झाल्यानंतरच महापौर निवड प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे. त्यातच, भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महापौरपदाबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करत शिवसेना शिंदे गटाला थेट इशाराच दिलाय. उबाठाचा महापौर करण्याचा दूर दूरपर्यंत विषय नाही, महापौर होईल तर भाजपचाच होईल नाहीतर आम्ही विरोधी पक्षात बसू, अशा शब्दात मुनगंटीवार यांनी महापौर पदाबाबत भूमिका मांडली. तसेच, दुसऱ्या पक्षाचा महापौर करण्यात भाजपच्या नगरसेवकांना कुठलीच रुची नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे, मुनगंटीवार यांनी शिंदेसेनेला थेट आव्हानच दिले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles