Friday, February 20, 2026

अहिल्यानगर महापालिकेच्या महापौरपदावर मूळ ओबीसीला संधी द्यावी ;भाजपच्या बड्या नेत्याच विधान

भाजपच्या बड्या नेत्याच विधान
महापौरपदावर मूळ ओबीसीला संधी द्यावी- ऍड. आगरकर
नगर, – अहिल्यानगर महापालिकेच्या महापौरपदासाठी ओबीसी महिला प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे महापौरपदावर मूळ ओबीसीला संधी मिळाली पाहिजे, अशी मागणी भाजपाचे माजी शहरजिल्हाध्यक्ष ऍड. अभय आगरकर यांनी केली.
ओबीसी प्रवर्गात एकूण 247 जातींचा समावेश आहे. यामधील कुठल्याही एका समाजातील नगरसेविकेला महापौरपदाची संधी दिली पाहिजे, असे ते म्हणाले. भाजपा- राष्ट्रवादीने एकत्रितपणे महापालिकेची निवडणूक लढविली आहे. यामध्ये भाजपाला 25 तर राष्ट्रवादीला 27 जागा मिळाल्या आहेत. महापौरपदासाठी ओबीसी महिला प्रवर्गातील आरक्षण जाहीर झालेले आहे. भाजपा आणि राष्ट्रवादीने महापौरपदाबाबत सस्पेन्स ठेवलेला आहे. त्यातच आज भाजपाचे माजी शहर जिल्हाध्यक्ष ऍड. अभय आगरकर यांनी मूळ ओबीसी समाजातील नगरसेविकेलाच महापौरपदाची संधी दिली पाहिजे, अशी मागणी केली. ऍड. आगरकर यांनी म्हटले की, भाजपा आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना माझी विनंती आहे की, मूळ ओबीसी समाजाला महापौरपदावर संधी देऊन या समाजाला न्याय दिला पाहिजे. सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे परंतु सत्तेत आतापर्यंत तुलनेने मूळ ओबीसी समाजाला अल्प वाटा मिळाला आहे. समाजातील शेवटचा घटक मुख्य प्रवाहात येण्यासाठी आरक्षण देण्यात आले आहे. सत्तेपासून उपेक्षीत असणार्‍यांना संविधानाने आरक्षण दिले आहे. आरक्षीत प्रवर्ग तयार केलेले असताना त्यामागील हेतू सफल होणे गरजेचे आहे, असेही ऍड. आगरकर म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles