जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात साड्यांचे वाटप, भरारी पथकाने टेम्पो पकडला; 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. करवीर तालुक्यात मतदारांना वाटण्यासाठी आणलेल्या साड्यांच्या टेम्पोवर भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द परिसरात भरारी पथकाने संशयास्पद टेम्पो अडवत तपासणी केली. या टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणावर साड्यांच्या पिशव्या आढळून आल्या. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करवीर तालुक्यातील महिला मतदारांना या साड्या वाटप केल्या जाणार होत्या. विशेष म्हणजे या साड्यांच्या पिशव्यांमध्ये स्थानिक उमेदवारांचे फोटो आणि हँडबिल्स ठेवण्यात आले होते. त्यामुळे ही साड्यांची वाटप प्रक्रिया निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन असल्याचा संशय अधिक बळावला आहे.

भरारी पथकाने सुमारे सात ते दहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. घटनास्थळी भरारी पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकीदरम्यान आमिषाच्या माध्यमातून मतदारांवर प्रभाव टाकण्याचे प्रकार रोखण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. पुढील चौकशी सुरू असून संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles