Thursday, February 19, 2026

IMD…मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट

IMD मागील अनेक दिवासांपासून मुंबईसह राज्यभरात कडाक्याची थंडी होती. आता मात्र थंडीचा कडाका कमी होत आहे. मात्र आता थंडीनंतर अचानक राज्यभरातील अनेक भागात पावासाच्या सरींनी हजेरी लावली. मुंबईसह रायगडमध्येही पावसाच्या सरी कोसळल्या. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाचा परिणाम राज्याच्या काही भागांवर होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील एकूण 6 जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यात ढगाळ हवामान असेल. मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 27 जानेवारीपासून महाराष्ट्रात थंडीचा जोर कमी होईल, परंतु दिवसा तापमानात वाढ आणि उष्ण हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार भागातही दिवसभर ढगाळ हवामान असेल. उत्तर महाराष्ट्रात हवामान खात्याने काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि लातूर भागातही ढगाळ वातावरण असेल. 27 आणि 28 जानेवारी रोजी काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles