Thursday, February 19, 2026

कुठलाही रंग कोणाच्या बापाचा नाही… अभिनेते सयाजी शिंदेंनी सहर शेखला सुनावलं

मुंब्रा येथे AIMIM पक्षाच्या सहर शेख (Sahar Sheikh) या नगरसेविका म्हणून निवडून आल्या. जिंकून आल्यानंतर एका भाषणात ‘कैसा हराया’ असं म्हणत त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना डिवचलं होतं. त्याचबरोबर पुढच्या पाच वर्षात संपूर्ण ‘मुंब्रा हिरवा करू ‘ असं वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या वक्तव्यावर आता अभिनेते सयाजी शिंदेंनी सडकून टीका केली आहे. (Sayaji Shinde)’ कुठलाही रंग कोणाच्या बापाचा नाही’ असं म्हणत त्यांनी नगरसेविकेला चांगलंच सुनावलं आहे.

टीव्ही नाईन ला दिलेल्या मुलाखतीत सयाजी शिंदें म्हणाले ‘ कुठलाही रंग कोणाच्या बापाचा नाही. सगळे रंग निसर्गाच्या बापाचे आहेत .निसर्ग आपलं मूळ आहे. त्याच्यामध्ये सगळे रंग आहेत . कोणाला आव आणून असं करता येत नाही.हे रंग आतून येतात आणि ते फक्त झाडांमधून येतात ‘ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

दरम्यान मुंब्रा हिरवा करू या वक्तव्याने वाद उसळल्यानंतर MIM नगरसेविका सहर शेख यांनी पत्रकार परिषदेत वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढू नका असं म्हणत बाजू स्पष्ट केली. त्या म्हणाल्या” आमच्या पक्षाचा झेंडाच हिरवा आहे म्हणून मी हिरवा म्हणाले. वेगळ्या रंगाचा असला असता तर त्या रंगाचा म्हणाले असते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles