राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला आहे. सर्वातआधी अजित पवार गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत होती. पण आता अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर अपघाताच्या शेवटच्या क्षणी काय झालं याबद्दल देखील मोठी माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्यासोबत 6 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे..
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार सकाळी मुंबईहून बारामतीच्या दिशेने सभेसाठी विमानाने रवाना झालेले. एका छोट्या विमाने अजित पवार नेहमीच प्रवास करत असतात. आज देखील छोट्या विमानाने बारामती येथे लँडिंग करत होते. लँडिंगदरम्यान अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. एका शेतामध्ये विमान कोसळलं आहे. विमानात अजित पवार यांच्यासोबत त्यांचे सेक्योरिटी आणि पीए देखील विमानात होते. ते गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तर धक्कादायक गोष्ट म्हणजे अजित पवार देखील गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रशासनाकडून कार्य सुरु आहे.
राज्यामध्ये पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. आज अजित पवार यांचा बारामती दौरा होता. या बारामती दौऱ्यासाठी आज सकाळी बारामतीसाठी त्यांनी प्रस्थान केलं होतं. बारामतीमध्ये विमान लाँडिंग होत असतानाच विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने विमान अपघातग्रस्त झाले. विमानामध्ये अजित पवार यांच्यासह सहा जण होते आणि या सहा जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे.अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये अजित पवारांसह जखमींना बारामतीमध्येच उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे अजित पवार यांच्या दादा पर्वाच्या राजकारणाचा अकाली अस्त झाला आहे. राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या साडेचार दशकांपासून अजित पवार हे गारुड सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चिलं गेलं आहे. राजांच्या राज्याच्या राजकारणामध्ये त्यांची धडाडी, राष्ट्रवादीचे एकहाती नेतृत्व आणि शरद पवारांचे वारसदार म्हणून अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाहिलं जात होतं. मात्र, अजित पवार यांच्या अकाली जाण्याने पवार कुटुंबीयांसह अवघ्या राज्याला मुळापासून हादरा बसला आहे. अपघातग्रस्त विमान पाहिल्यानंतर अनेकांना जागेवर अश्रु अनावर झाले.


