एकीकडे राज्यातील आरक्षणवरून मुद्यावरून जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणुका लांबणीवर गेल्या. तर आता कार्यकाळ संपणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायतिच्या निवडणुका किमान सहा महिने लांबणीवर (Gram Panchayat Election 2026) जाणार आहे. यात यवतमाळ जिल्ह्यातील 980 ग्रामपंचायती असून राज्यातील 14237 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ येत्या वर्षात संपणार आहे.
जानेवारी 2026 पासून डिसेंबर 2026 पर्यंतच्या काळात कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणूक करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने नुकतेच काढले आहे. यावर 14 ऑगस्ट 2020च्या शासन आदेशानुसार प्रशासकाची नियुक्ती होणार आहे. तसे आदेश ग्रामविकास विभागाचे अपर सचिवांनी काढले असून जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांना आदेश धडकले आहे.
लांबणीवर जाणाऱ्या विभाग निहाय ग्रामपंचायत निवडणूक
अमरावती विभाग-
2451 ग्रामपंचायती
नागपूर विभाग-
1508 ग्रामपंचायत
कोकण विभाग-
798 ग्रामपंचायत
नाशिक विभाग-
2476 ग्रामपंचायत
पुणे विभाग-
2870 ग्रामपंचायत
छत्रपती संभाजीनगर विभाग-
4134 ग्रामपंचायत
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखेमध्ये राज्य निवडणूक आयोगाने बदल केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या दुखवट्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार 5 फेब्रुवार रोजी होणारे मतदान आता 7 फेब्रुवारी रोजी होणार असून आहे. तर मतमोजणीची तारीखही बदलून 9 फेब्रुवारी करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी 13 जानेवारी 2026 रोजी सविस्तर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्या कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे, नामनिर्देशनपत्र मागे घेणे, निवडणूक चिन्ह वाटप तसेच अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे अद्याप शिल्लक होते.


