सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे आज सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. १० तोळा सोन्याचे दर तब्बल ८२,३०० रुपयांनी स्वस्त झाले. तर १ ग्रॅम चांदीचे दर ५ रुपयांनी कमी झाले आहेत. आज सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी जर तुम्ही जाणार असाल तर आजचे १८, २२ आणि २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर आणि चांदीचे दर किती आहेत हे पाहून जा…
गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ८,२३० रुपयांनी घसरण झाली आहे. २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,७०,६२० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात तब्बल ८२,३०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १७,०६,२०० रुपये खर्च करावे लागणार आहे.
आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ७,५५० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,६५,४०० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २२ कॅरेटचे १० तोळा सोनं ७५,५०० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १५,५४,००० रुपये खर्च करावे लागणार आहेत. सोन्याचे दागिने हे २२ कॅरेटचे तयार केले जातात. त्यामुळे हे सोनं खरेदीकडे ग्राहकांचा कल जास्त असतो. आज जर तुम्ही २२ कॅरेटचे सोनं खरेदी करणार असाल तर तुम्हाला फायदा होऊ शकतो.
२४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली. आज १८ कॅरेटचे १ तोळा सोनं ६,१७० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,२७,९७० रुपये खर्च करावे लागतील. तर आज १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ६१,७०० रुपयांनी घसरण झाली. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १२,७९,७०० रुपये खर्च करावे लागणार आहेत.
दरम्यान, सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. आज १ ग्रॅम चांदीच्या दरात १५ रुपयांनी घसरण झाली आहे. १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला ३९५ रुपये खर्च करावे लागणार आहे. तर १ किलो चांदीचे दर तब्बल १५,००० रुपयांनी स्वस्त झाले आहे. ही चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला ३,९५,००० रुपये खर्च करावे लागणार आहे. त्यामुळे आज चांदी खरेदी करताना तुमच्या खिशावर ताण येणार नाही.


