Friday, February 20, 2026

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोमवारी सर्वपक्षीय शोक सभेत श्रध्दांजली

स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्व पक्षीय शोकसभा.
नगर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाने राज्याच्या राजकीय, सामाजिक व सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी सर्व पक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली आहे.
सर्वपक्षीय शोकसभा सोमवार, दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजता सहकार सभागृह, अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आली आहे.
स्वर्गीय अजितदादा पवार यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत जनतेच्या प्रश्नांसाठी कठोर भूमिका घेतली. प्रशासनावर मजबूत पकड, निर्णयक्षमता आणि विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे त्यांनी राज्याच्या राजकारणात वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या जाण्याने एक अनुभवी, लोकनेतृत्व करणारा नेता हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
ही सर्वपक्षीय शोकसभा जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचे अध्यक्षतेखाली व जिल्ह्यातील आजी – माजी खासदार, आजी माजी – आमदार, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी, सर्व सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, त्यांचे समवेत जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, शैक्षणिक आदीसह सर्व क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन कपिल पवार उत्तर जिल्हाध्यक्ष, अशोक सावंत दक्षिण जिल्हाध्यक्ष, संजय कोळगे, कार्याध्यक्ष व संपत बारस्कर शहराध्यक्ष यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles