काकानी नको म्हटले म्हणून दोन वेळा मुख्यमंत्रीपदापासून बाजूला सरकलेला आज्ञाधारक पुतण्या…

भाजपचे आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळं अगणित, अपरिमित शब्द कमी पडेल इतकं मोठं नुकसान झालं आहे, असं म्हटलं. एकट्या पवार घराण्याचं, पक्षाचं, पक्ष, विचारधारा आपलं चालूच राहील, परंतु, सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारा, सगळ्यांची सगळ्या पद्धतीनं व्यवस्था पाहणारा एक माणूस आपल्यातून हरपला हे मान्य करावा लागेल, असं सुरेश धस यानी म्हटलं

अजित पवार यांच्यासारखा आज्ञाधारक पुतण्या जगात दुसरा कोणी होणार नाही. तुम्हाला याचं कोडं पडेल परंतु मला स्वत: माहिती आहे. दोन वेळा राज्याचं मुख्यमंत्रिपद भेटत असताना सुद्धा साहेब नको म्हणाले म्हणून बाजूला सरकलेला पुतण्या हा आहे हे आपल्याला नम्रपणे या ठिकाणी सांगतो, पुढे काय झालं त्याच्या बद्दल भाष्य करत नाही. जगातील सर्वात आज्ञाधारक पुतण्या असा मी त्यांचा या ठिकाणी उल्लेख करेन.

आमच्या दादांना योग्य त्या ठिकाणी ईश्वरानं जागा द्यावी एवढीच विनम्र प्रार्थना करतो. आपल्या सर्वांच्या भावना त्याच आहेत, काही जण डोळ्याच्या बाहेर अश्रू काढू शकत असतील, आपण नाही काढू शकत नाही. पंरतु मनात भावना आहे, काल तर मला देखील आवरता आलं नाही. पंरतु, तुम्हाला सांगतो अनेक लोकांनी, घरादारातल्या लहान लेकरांना वाईट वाटलं, लहान लेकरं सुद्धा त्या दिवशी रडली, असं म्हणत सुरेश धस यांनी अजित पवार यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles