शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत वक्तव्य केलं. पण राष्ट्रवादी काँग्रेसकडून यावर प्रतिक्रिया आलेली नाही, यावर सुनील तटकरे यांनी उत्तर दिलं. “विलिनीकरणाबाबत श्रद्धेय साहेबांनी जी प्रतिक्रिया दिली, त्यावर मी बोलणार नाही. इतरांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या, त्या बारामतीत अंत्यसंस्कार सुरु होण्यापूर्वीच सुरु झालेलं. विलिनीकरण कुठल्या पक्षाचं कुठल्या पक्षात?. शिंदे साहेबांनी भावनिक होऊन शपथ घेऊन वक्तव्य केलं, जर कळलं तर नक्की बोलता येईल” असं सुनील तटकरे म्हणाले.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये यासाठी एका गटाकडून कट शिजवला जातोय असं विजय वडेट्टीवार बोललेत. त्यावर “विजय वडेट्टीवार काय बोलतात, त्यापेक्षा चंद्रपुरात काँग्रेसचा महापौर करावा. काँग्रेस अंतर्गत पळवापळवी करणाऱ्या विजय वडेट्टीवारांना आमच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. काँग्रेसचा महापौर कोणत्या गटाचा होणार? याची काळजी त्यांनी घ्यावी. नंतर आमच्याकडे पहावं” असं सुनील तटकरे म्हणाले
“भाजपप्रणीत एनडीएमध्ये येण्यासंदर्भात भूमिका ज्यांना सोबत यायचं आहे, त्यांनी स्पष्ट करण्याची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका पूर्वीपासून ठरली आहे. निवडणुकीला सामोरं गेलो. यश मिळालं” असं सुनील तटकरे म्हणाले. दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं यासाठी सुनेत्रा पवारांनी पुढाकार घ्यावा असं म्हटल जातय. “त्यावर दादा असल्यापासून आम्ही एनडीएमध्ये आहोत. म्हणजे भाजपसोबत सत्तेत आहोत. या निर्णयाला जे अनुकूल आहेत, त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे”


