पुणे शहरात १४ दिवसांसाठी जमावबंदी, काय सुरू अन् काय बंद?

पुणे शहरात पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात राजकीय आणि सामाजिक संघटना आक्रमक झाल्या असतानाच, प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले आहे. पुणे शहरात उद्या (मंगळवारी) रात्रीपासून पुढील १४ दिवसांसाठी ‘जमावबंदीचे आदेश’ लागू करण्यात आले आहेत. या काळात कोणत्याही प्रकारचे मोर्चे, आंदोलने आणि सभा घेण्यास प्रशासनाने पूर्णपणे बंदी घातली आहे.सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ च्या कलम ३७ (१) (२) (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश करण्यात आला आहे. जमावबंदी हा सर्वात जास्त वापरले जाणारे उपकलम आहे. मोर्चे, मिरवणुका, सभा बंद करता येतात. सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी लोकांच्या जमावावर निर्बंध घातले जातात हा आदेश साधारणत १५ दिवसांपर्यंत लागू राहू शकतो; पुढे वाढवण्यासाठी राज्य सरकारची मंजुरी लागते.सध्या पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे पुणे शहरात मोठ्या प्रमाणात राजकीय संघटना आणि सामाजिक संघटनांकडे आंदोलन करण्यात येते त्या पार्श्वभूमीवर आदेश काढलेत का? असा प्रश्न विचारला जातो. या आदेशानुसार नुसार शस्त्रे बाळगणे दगड, स्फोटके, लाठ्या इ. ठेवणे, भडकाऊ घोषणा, गाणी, भाषणे,सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या कृती यांवर बंदी लागू करता येते. जर एखाद्या व्यक्तीने वरील बंदीचे उल्लंघन करून शस्त्र किंवा धोकादायक वस्तू बाळगल्या तर: पोलीस त्या वस्तू जप्त करू शकतात संबंधित व्यक्तीवर कारवाई होऊ शकते.
पुणे शहरात होणाऱ्या बकरी ईद तसे च इतर सण-उत्सवाचे अनुषंगाने पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखणे आवश्यक आहे.

कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, ज्वलनशील द्रव पदार्थ बरोबर नेणे.

दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.

शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे.

कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे, पुढा-यांच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

मोठयाने अर्वाच्च घोषणा देणे, सार्वजनीक टिका करणे, उच्चार गाणी गाणे, वाद्य वाजविणे.

शिष्टाचाराच्या विरोधात असणारे चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणतीही वस्तु वापरणे किंवा वस्तु तयार करणे, प्रदर्शन करणे किंवा प्रसारित करणे जेणे करुन सार्वजनिक नैतिकता किंवा सुरक्षा धोक्यात येईल किंवा राज्य उलथून टाकण्यास कारणीभूत ठरू शकेल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles