अहिल्यानगर भाजप राष्ट्रवादी युतीचे महापौर-उपमाहापौर पदाचे उमेदवार ठरले. महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या ज्योती गाडे तर
उपमहापौर पदासाठी भाजपचे धनंजय जाधव यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना दिल्याची माहिती. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत झाली नगरसेवकांची बैठक.
अहिल्यानगर महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप युतीने निवडणूक लढवली होती. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसला 27, भाजपला 25 अशा एकूण 52 जागा युतीकडे आल्या आहेत. दोन्ही पक्षांच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी विभागीय आयुक्त कार्यालयात स्वतंत्र गट नोंदणी केली असून, सत्ता वाटपाबाबत सहमती झाल्याचे संकेत मिळत आहेत. महापौर पदासाठी आज एकापेक्षा अधिक अर्ज दाखल झाल्यास 6 फेब्रुवारीच्या विशेष सभेत मतदानाव्दारे निवड केली जाणार आहे. मात्र, जर दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्यास निवड बिनविरोध होऊन त्याची औपचारिक घोषणा 6 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे
महापौर पद राष्ट्रवादीकडे गेल्यानंतर उपमहापौर पद भाजपकडे जाण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर एक महत्त्वाची समितीही भाजपच्या वाट्याला जाण्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपमध्येही उपमहापौर पदासाठी हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत.अखेर विखे पाटील पसंती नगरसेवक अॅड. धनंजय जाधव यांच्या नावांची जोरदार चर्चा असून,


