Thursday, February 19, 2026

माझ्याकडे 10 ग्रॅमची चैन असेल आणि ती बँकेत गहाण ठेवली किती कर्ज मिळू शकते?

सोन्यावर कर्ज घेणे म्हणजे फक्त पैसे उभारणे नव्हे, तर ते त्वरित मदत आणि कमी त्रास देणारा सोपा पर्याय आहे.माझ्याकडे 10 ग्रॅम सोन्याची चेन किंवा अंगठी आहे, तर बँक नेमके किती कर्ज देईल? व्याज किती लागेल आणि EMI कसा काढला जातो?

RBIच्या नियमांनुसार बँका सोन्याच्या मूल्याच्या ठराविक टक्केवारीपर्यंतच कर्ज देतात, ज्याला Loan to Value (LTV) रेशो म्हणतात. सध्या छोट्या कर्जांसाठी (2.5 लाखांपर्यंत) 85% पर्यंत, 2.5 ते 5 लाखांपर्यंत 80% आणि त्यापेक्षा जास्त रकमेसाठी 75% पर्यंत कर्ज मिळू शकते. म्हणजे सोन्याचे मूल्य जितके जास्त, तितके कर्ज जास्त मिळण्याची शक्यता.

समजा तुमच्या १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचे मूल्य १,४०,००० रुपये आहे. LTV नुसार छोट्या कर्जात ८५% पर्यंत मिळू शकते, म्हणजे सुमारे १,१९,००० रुपये. सामान्यतः ७५ ते ८०% च्या दरम्यान १,०५,००० ते १,१२,००० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त मिळू शकते. आजच्या उच्च भावामुळे १० ग्रॅम सोन्यावर ९०,००० ते १,२०,००० रुपये आरामात कर्ज मिळण्याची शक्यता आहे.

गोल्ड लोनचा सर्वात मोठा फायदा म्हणजे व्याजदर वैयक्तिक कर्जापेक्षा खूप कमी असतो. प्रमुख बँकांमध्ये (जसे SBI, HDFC, ICICI) व्याजदर सध्या ८.५% ते १२% p.a. पर्यंत आहेत. SBI सारख्या बँकांमध्ये ८.७५% पासून सुरू होऊ शकतात, तर काही NBFC मध्ये ९.५% ते १८% पर्यंत जाऊ शकतात. परतफेडीचे पर्यायही सोपे आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles