Thursday, February 19, 2026

Dhurandhar 2 रणवीर सिंगच्या ‘धुरंधर २’ चा पहिला टीझर भेटीला Video

Dhurandhar 2

‘धुरंधर पार्ट २ – द रिव्हेंज’ सिनेमाचा टीझर भेटीला आला आहे. या सिनेमाच्या टीझरची काल दिग्दर्शक आदित्य धरने घोषणा केली होती. १२ – १२ असा आकडा त्याने टाकला होता. अखेर आज बरोबर १२ च्या ठोक्याला ‘धुरंधर पार्ट २’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. १ मिनिटं १२ सेकंदचा हा टीझर जबरदस्त असून दिग्दर्शकाने सिनेमाची रिलीज डेटही जाहीर केली आहे.

टीझरमध्ये हमजा अली मजारी अर्थात रणवीर सिंगचं पूर्वायुष्य दिसणार आहे. शांत, साध्या स्वभावाचा हमजा ‘धुरंधर’ कसा झाला, याचा प्रवास ‘धुरंधर पार्ट २’मध्ये दिसणार आहे. रणवीर सिंगच्या अभिनयाची ताकद टीझरमध्ये पाहायला मिळतेय. टीझरच्या शेवटी एक संवाद दिसतोय. जो सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. ”ये नया हिंदुस्तान है, ये घरमें घुसेगा भी और मारेगा भी”.

या टीझरमध्ये एक खास गोष्ट बघायला मिळतेय. पहिल्या भागात अक्षय खन्ना ‘शेर ए बलुच’ झाला होता आणि त्याने केलेला डान्स चांगलाच गाजला होता. आता दुसऱ्या भागात रणवीर सिंग ‘शेर ए बलुच’च्या गादीवर बसलेला दिसतोय. याशिवाय पुन्हा एकदा Fa9la गाण्याची झलक दिसतेय. ‘धुरंधर पार्ट २’मध्येही रक्तरंजित थरार बघायला मिळणार आहे.

‘धुरंधर पार्ट २’ सिनेमा कधी रिलीज होणार, याकडे सर्वांचं लक्ष होतं. टीझरच्या शेवटी याचाही खुलासा होत आहे. १९ मार्च २०२६ ला ‘धुरंधर पार्ट २’ रिलीज होणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles