Ajit Pawar Dashkriya Vidhi:अजित पवारांचे पुढचे कोणतेही विधी होणार नाहीत, कारण….

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारीला बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झाले होते. येत्या 6 जानेवारीला त्यांचा दशक्रिया विधी होणे अपेक्षित होते. मात्र, अजित पवार यांचा दशक्रिया विधी अगोदरच पार पडल्याची माहिती त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी प्रसारमाध्यमांना दिली. अजित पवार यांचे 28 जानेवारीला निधन झाल्यावर दुसऱ्याच दिवशी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान येथील मैदानात त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर लगेच 30 तारखेला अजित पवार यांचा अस्थी सावडण्याचा कार्यक्रम पार पडला होता. त्याचदिवशी सोनगाव येथील कऱ्हा-नीरेच्या संगमावर अजित पवार यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले होते. यानंतर अजित पवार यांचा दशक्रिया विधी होणे अपेक्षित होते. मात्र, हा दशक्रिया विधी तिसऱ्याच दिवशी म्हणजे 30 जानेवारीला पार पडल्याची माहिती श्रीनिवास पवार यांनी दिली. त्यामुळे आता इथून पुढे अजित पवार यांचा कुठलाही विधी होणार नाही, अशी माहिती श्रीनिवास पवार यांनी दिली.कुटुंबीयांनी अस्थि विसर्जनाच्या वेळीच आवश्यक ते सर्व विधी पूर्ण केले आहेत. त्यामुळे आता 10 व्या किंवा 13 व्या दिवसाचा कोणताही सार्वजनिक किंवा धार्मिक विधी आयोजित केला जाणार नाही, असे श्रीनिवास पवार यांनी सांगितले. या सगळ्यावर अजित पवारांच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार किंवा जय पवार यांनी याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. श्रीनिवास पवारांनी पवार कुटुंबीयांशी चर्चा करूनच ही माहिती दिल्याचे समजते.

दरम्यान, आज बारामतीच्या काटेवाडी येथील अजित पवार यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 3 जानेवारीला अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. सुनेत्रा पवार यांनी सोमवारी कराड येथे जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले होते. यानंतर सुनेत्रा पवार पुन्हा बारामतीत परतल्या होत्या. सुनेत्रा पवार या मंगळवारी काटेवाडी येथे असणार आहेत. काटेवाडी येथील सहयोग या निवासस्थानी पवार कुटुंब दुपारी चार वाजेपर्यंत सांत्वनपर भेटी स्वीकारणार आहेत. त्यामुळे आज सकाळपासून काटेवाडी येथे पवार कुटुंबीयांना भेटण्यासाठी नेत्यांची व लोकांची रीघ लागली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles