ड्रायव्हरचे हात पाय बांधुन ट्रकमधील गव्हाचे पोते लुटणारे 04 आरोपी 35,40,000/- रुपये किमतीचे मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांचेकडुन जेरबंद.
—————————————————————————————————————————————
प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, फिर्यादी श्री जगदिश चतृभुज माळी वय 55 वर्षे, रा. लहुजा, ता. सितामऊ, जि. मंदसौर, मध्यप्रदेश हे त्यांचेकडील टाटा कंपनीची गाडी क्रमांक आर. जे. 09 जी. ई. 5957 हिमध्ये मध्यप्रदेश राज्यातुन गहु भरुन सोलापुर या ठिकाणी घेवुन जाण्यासाठी निघाले असतांना दिनांक 27/01/2026 रोजी रात्री 08.30 वा. चे सुमारास देहरे टोलनाक्याजवळ 4 तोंड बांधलेल्या इसमांनी फिर्यादीचे ताब्यातील गाडीमध्ये घुसुन फिर्यादी व क्लिनर यांना चाकुने जिवे ठार मारण्याची धमकी देवुन त्यांचे हात पाय बांधुन गाडीचे केबिनमध्ये झोपवले व गाडीमधील 9,67,200/- रुपये किमतीचे गव्हाचे 953 कट्टे आरोपींचे ताब्यातील गाडीमध्ये भरुन घेवुन गेले तसेच फिर्यादी व क्लिनर यांना निवडुंगे, ता. पाथर्डी शिवारामध्ये गाडीसह सोडुन दिले आहे. सदर घटनेबाबत एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे गु.र.नं. 67/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309 (4), 3(5) प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हा घडल्यानंतर मा. श्री सोमनाथ घार्गे सो, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले आहे. सदर आदेशानुसार पो. नि. श्री किरणकुमार कबाडी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांचे नेतृत्वाखाली 03 पथके तयार करण्यात आली होती. सदर पथकामध्ये पोउपनि/अनंत सालगुडे, संदीप मुरकुटे, महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार शाहिद शेख, गणेश धोत्रे, विष्णु भागवत, विजय पवार, दिपक घाटकर, फुरकान शेख, राहुल डोके, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, योगेश कर्डीले, विशाल तनपुरे, रमिझराजा आतार, प्रशांत राठोड, अरुण मोरे, भगवान धुळे, उत्तरेश्वर मोराळे यांचा समावेश करण्यात आला होता.
वरील पथकांनी तात्काळ घटनाठिकाणी भेट देवुन आरोपीचे गुन्हा करण्याची पध्दत तसेच व्यवसायीक कौशल्याचे आधारे आरोपींची माहिती काढत असतांना पथकास सदरचा गुन्हा हा अर्जुनसिंग सरदार रा. कोलारस, जि. शिवपुरी व त्याचे साथीदारांनी सदरचा गुन्हा केल्याची माहिती प्राप्त झाली. सदर माहितीचे आधारे आरोपींचा मध्यप्रदेश राज्यामध्ये शोध घेत असतांना सदरचे आरोपी हे शिवपुरी मध्यप्रदेश येथुन पुणे या ठिकाणी जाणारे असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने आरोपींच्या ट्रकचा पाठलाग करुन सदरची ट्रक नंबर आर. जे. 11 जी. सी. 2704 ही अरणगांव परिसरामध्ये ताब्यात घेतली. सदर ट्रकमध्ये 02 इसम मिळुन आले. सदर इसमांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 1) अर्जुनसिंग नारायणसिंग सरदार वय 41 वर्षे, रा. कोलारस, ता. कोलारस, जि. शिवपुरी, मध्यप्रदेश, 2) सागरसिंग गुरजंदसिंग सरदार वय 44 वर्षे, रा. कोलारस, ता. कोलारस, जि. शिवपुरी, मध्यप्रदेश असे असल्याचे सांगितले.
ताब्यातील इसमांकडे गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने विचारपुस करता त्यांनी त्यांचे इतर साथीदार 3) कल्ला शब्बीरा कोहरी वय 25 वर्षे, रा. कोलारस, ता. कोलारस जि. शिवपुरी, मध्यप्रदेश, 4) रतीलाम मदनलाल मदनलाल कोहरी वय 40 वर्षे, रा. सबालगड, ता. सबालगड, जि. मुरैना, मध्यप्रदेश यांचेसह केल्याची कबुली दिली असुन सदर आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे.
आरोपींनी चोरी केलेला गहु विकण्याचे दृष्टीने दुसरे प्लॅस्टीक बारदाना खरेदी करुन चोरीचा गहु सदर बारदानामध्ये भरलेला असुन आरोपींकडुन एकुण 10,40,000/- रुपये किमतीचा 475 गोण्यामध्ये भरलेला एकुण 26 टन गहु, 25,00,000/- रुपये किमतीचा ट्रक क्रमांक आर. जे. 11 जी. सी. 2704 असा एकुण 35,40,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ताब्यातील आरोपींना गुन्ह्याचे पुढील तपासकामी एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले असुन पुढील तपास एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा.श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे
नगर तालुक्यात ड्रायव्हरचे हातपाय बांधून ट्रकमधील गव्हाचे 953 कट्टे लंपास…
- Advertisement -


