Thursday, February 19, 2026

Bollywood मध्ये खळबळ…गोविंदासह बड्या अभिनेत्यांवर गुन्हा दाखल

Bollywood बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते गोविंदा , शक्ती कपूर , चंकी पांडे आणि भाजप खासदार तथा प्रसिद्ध गायक मनोज तिवारी यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. गाझियाबाद येथील एका कंपनीच्या कथित गुंतवणूक फसवणूक प्रकरणात या चारही कलाकारांविरुद्ध झारखंडमधील जमशेदपूर इथं FIR नोंदवण्यात आला आहे.

हा गुन्हा ‘मॅक्सिझोन टच प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीशी संबंधित आहे. या कंपनीनं गुंतवणूकदारांना दरमहा १५ टक्के परतावा देण्याचं आमिष दाखवून कोट्यवधी रुपये गोळा केले होते. मात्र, आश्वासन दिल्याप्रमाणे गुंतवणूकदारांना ना परतावा मिळाला, ना त्यांची मूळ रक्कम परत मिळाली.

जमशेदपूर इथल्या रहिवासी जसपाल सिंग यांनी याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली होती. सिंग यांनी आरोप केला की, या चित्रपट कलाकारांनी कंपनीच्या जाहिरातींमध्ये काम केल्यामुळं आणि त्यांच्या लोकप्रियतेवर विश्वास ठेवून त्यांनी या योजनेत लाखो रुपयांची गुंतवणूक केली होती.

जसपाल सिंग यांच्या तक्रारीची दखल घेत जमशेदपूरच्या मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयानं पोलिसांना या प्रकरणात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले . त्यानुसार, पोलीस ठाण्यात कंपनीचे संचालक चंद्रभूषण सिंग आणि त्यांची पत्नी प्रियंका सिंग यांच्यासह या सेलिब्रिटींविरुद्ध फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles