मराठा आरक्षणाच्य मुद्द्यावरुन मनोज जरांगे यांनी याआधीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केल्याचं दिसून पाहायला मिळालं. आता पुन्हा उपोषणाची घोषणा करताना मनोज जरांगे यांनी थेट नाव घेत इशारा दिलायं. ते अंतरवली सराटीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
जरांगे पुढे बोलताना म्हणाले, मी मुंबईला सोबत जाताना दोन रथ सोबत घेऊन जाणार आहे. एक विजयाचा रथ आणि एक अंत्य अंतिम यात्रेचा रंथ असणार आहे. या यात्रेदरम्यान, मराठा समाजाच्या एकाही पोराला धक्का लागल्यास महाराष्ट्रातला एकाही आमदार, खासदाराला घराच्या बाहेर फिरु देणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत
आमच्या लेकराबाळांचं जर वाटोळ होत असेल आता आम्ही शांत बसणार नाहीत. मराठा आणि कुणबी हे एकच आहेत. त्यांचे पुरावे पोलिस पाटील, ग्रामपंचायत देवस्थानाकडे यासंदर्भातील पुरावे आढळून आलेले आहेत. त्यामुळे आता मराठा आणि कुणबी हे एकच असल्याचा कायदा सरकारने पारित करावा, आणि गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या 28 ऑगस्टला मुंबईत उपोषण करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केलीयं.
तुम्हाला ही सत्ता मराठ्यांनी दिली आहे. नेत्यांचं ऐकून जातीवाद हा शिक्षणात आणू नका. सग्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तात्काळ करावी. तुम्ही आमचा हक्क नाकारू नका. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 58 लाख पुरावे सापडले आहेत. सत्ता जात येत असते, जास्त गर्वात वागू नका, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

नोंदी सापडलेले प्रमाणपत्र तातडीने द्यायला सुरुवात करा. 58 लाख प्रमाणपत्राच्या व्हॅलिडीटी तात्काळ देण्यात यावा. आमचा हक्क आम्हाला देण्यात यावा आमचा हक्क रोखू नका, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.