Thursday, February 19, 2026

ठाकरे बंधूंच्या युतीला तडा, मनसे नगरसेवक शिंदे सेनेसोबत गटनोंदणीत

नाशिक महापालिकेच्या मनसेच्या एकमेव नगरसेविका मयुरी पवार यांनी शिंदेसेनेसोबत आपली सदस्यनोंदणी केली आहे. यामुळे स्थायी समितीवर भाजपचा एक सदस्य कमी होणार असला तरी, मनसेचे नाशिकमधील स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात येणार असल्याचे चित्र आहे. दरम्यान, स्थानिक पातळीवर विकासाच्या मुद्द्यावर पाठिंबा देण्यात आल्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी स्पष्ट केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

निवडणुकीत भाजपने १२२ पैकी ७२ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यापाठोपाठ शिवसेनेने २६ जागा जिंकून दुसरा क्रमांक मिळविला आहे. शिवसेना उबाठा १५, राष्ट्रवादी काँग्रेस चार, काँग्रेस तीन, तर मनसे व अपक्ष असे प्रत्येकी एक नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे महापौर, उपमहापौरांसह स्थायी समिती अध्यक्षपद भाजपकडेच राहणार आहे. परंतु, स्थायी समिती सदस्यांसह विषय समित्यांसाठी विरोधकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता मनसेच्या एकमेव नगरसेवकाने शिवसेनेसोबत गटनोंदणी केली आहे. त्यानंतर महापालिकांच्या सत्तेची गणिते जुळविण्यासाठी भाजपने शिवसेनेला उपमहापौरपद देऊ केले आहे. त्याशिवाय शिवसेनेनेदेखील स्थायी समितीमध्ये टक्का वाढवून आणखी एक सदस्य पाठविण्यासाठी मनसेला सोबत घेतले आहे. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे शिवसेनेने मनसेच्या एका सदस्याची गटनोंदणी केली. त्यामुळे सभागृहात नगरसेवकांचा आकडा २७ झाला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles