Thursday, February 19, 2026

लाडक्या बहिणींना ३ महिन्यांचे ४५०० रुपये एकत्रित मिळणार

राज्यातील लाडक्या बहिणींना ३ महिन्यांचे ४५०० रुपये एकत्रित मिळणार असल्याची घोषणा राज्याचे उपमख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे यांची जुन्नरमध्ये सभा झाली. या सभेत त्यांनी लाडक्या बहिणींना ४५०० एकत्रित मिळणार असल्याचे सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, ‘लाडकी बहिण योजना आवडती योजना आहे. आईच्या प्रेरणीतून लाडकी बहिण योजनेची संकल्पना आली. लाडकींना ३ महिन्याचे ४५०० रुपये एकत्रित मिळतील. लाडक्या बहिणींना स्वत:च्या पायावर उभं करायचं आहे. लाडक्या बहिणी लखपती होताना पहायचं आहे. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार असे आश्वासन दिले तेही लवकर पूर्ण होणार आहे.’

ई-केवायसीमध्ये चूक झाली त्यामुळे लाडकी बहीण योजनाच्या लाभार्थी महिलांचा लाभ बंद झाला आहे. या लाडकींना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांच्या हफ्त्याचे पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे या लाडक्या बहिणी नाराज झाल्या आहेत. हफ्त्याचे पैसे मिळावे यासाठी त्यांनी आंदोलनं देखील केली होती. आता या लाडक्या बहिणींना लवकरच पैसे मिळणार आहेत. त्यांची अंगणवाडी सेविकांकडून पडताळणी सुरू आहे. या ई-केवायसी प्रक्रियेत काही त्रुटी न आढळल्यास आणि ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील त्यांना ३ महिन्यांचे एकत्रित पैसे मिळणार आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles