Thursday, February 19, 2026

त्यांनी बरेच गैरसमजसुद्धा दूर केले…RSS च्या कार्यक्रमानंतर अदनान सामीची पोस्ट

मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) दोन दिवसीय शताब्दी समारोह आयोजित करण्यात आला होता. हा समारोह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींच्या उपस्थितीमुळे चर्चेचा विषय ठरला होता.

vदुसरीकडे पाकिस्तानला सोडून भारताचं नागरिकत्व स्वीकारणारा गायक अदनान सामी याने सोशल मीडियावर मोहन भागवत यांच्यासोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये शिल्पा शेट्टी, रुपाली गांगुली आणि रमेश तौरानी हेसुद्धा दिसत आहेत. या फोटोंसोबत अदनानने लिहिलं, ‘आरएसएसचे दिग्गज सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत उत्तम वेळ घालवला. त्यांचं भाषण मला खूप आवडलं आणि त्यांनी बरेच गैरसमजसुद्धा दूर केले. मिथकांबद्दलही त्यांनी चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं आणि ते दूर केले. अत्यंत अविश्वसनीय सज्जन आणि सुंदर व्यक्ती.’

करण जोहरने सोशल मीडियावर लिहिलं, ‘मी इथे आरएसएसला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने आलो आहे आणि इथे मोहन भागवत यांचं भाषण ऐकलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचे शब्द फक्त प्रेरणादायीच नव्हे तर त्यात दमदार विनोदबुद्धीही होती.’

अभिनेता सलमान खान या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी तिथे उपस्थित होता. तोसुद्धा मोहन भागवतांच्या भाषणाला हजर होता. यावेळी सामाजिक ट्रेंड आणि फॅशनच्या प्रभावाविषयी बोलताना भागवत म्हणाले की, समाजातील लोक अनेकदा प्रभावशाली लोकांकडे पाहून ट्रेंड फॉलो करतात.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles